Palghar Nargrik

Breaking news

वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदावर शरद पाटील यांची बिनविरोध निवड

पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी व सर्वात जुनी सहकारी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाडा ग्रुप सेवा सह. सोसायटीच्या चेअरमन पदाच्या निवडणूकीकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र आज दि. ३० एप्रिल रोजी झालेल्या निवडणूकीमधे तालुक्यातील आदर्श शेतकरी व सुशवी ॲग्रो या नामांकीत कृषी संस्थेचे संचालक शरद यशवंत पाटील यांची सर्व संचालकांनी बिनविरोध चेअरमन पदावर निवड केली. तर व्हाईस चेअरमन पदावर ज्येष्ठ संचालक शरद सोनटक्के यांचीही निवड बिनविरोध झाली.
शरद पाटील हे सलग तिसऱ्यांदा संचालक पदावर बिनविरोध निवडून आलेले आहेत. या पूर्वीही ते संस्थेचे व्हाईस चेअरमन व चेअरमन पदावर कार्यरत होते. या संस्थेमधे वाडा शहरासह एकूण २४ गावांचा समावेश होत असून एकूण १७५० सभासद आहेत. संस्थेची वार्षिक उलाढाल १२ कोटींची असून ८ ते १० कोटींपर्यंत सभासदांना कर्जाचे वाटप दरवर्षी केले जाते. संस्था सर्वात जुनी असून २४/०४/१९२९ रोजी इंग्रजांच्या काळात या संस्थेची स्थापना झालेली आहे.
संस्थेचा कारभार पारदर्शकरित्या राबवला जात असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातात, असे नवनिर्वाचित चेअरमन शरद पाटील यांनी सांगितले. २४ गावांच्या या संस्थेच्या १३ संचालकांचीही निवड बिनविरोध झालेली आहे.



पालघर टाउन में विश्वास का दूसरा नाम — KK GROUP

SINCE 1999

हम हैं KK GROUP – जहां हर ईंट में बसा है भरोसा, हर मंज़िल में झलकता है अनुभव।

पालघर के दिल में पिछले 25 सालों से लोगों का सपना साकार कर रहे हैं।

सच्चाई, गुणवत्ता और समय की पाबंदी – यही हमारी पहचान है।

आपके सपनों का आशियाना हो या कोई नया प्रोजेक्ट –

KK GROUP हमेशा तैयार है, आपके साथ, आपके लिए।

KK GROUP – PALGHAR KA VISHWASU BUILDER

Leave a Comment