Palghar Nargrik

Breaking news

सफाळे रेल्वे फाटक LC-42 बंद – पर्यायी व्यवस्था न दिल्याने नागरिक रस्त्यावर | आज आंदोलन

सफाळे (ता. पालघर): रिपोर्टर सन्नान शेख 

31 मार्च 2025 रोजी DFCC व रेल्वे प्रशासनाने सफाळेतील LC-42 क्रमांकाचा रेल्वे फाटक अचानक बंद केला. या बंदीमुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आजवर कोणतीही पर्यायी व्यवस्था न दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज 13 मे रोजी सकाळपासून रेल्वे स्थानकाजवळ तीव्र आंदोलन सुरू केले आहे.

सफाळे विकास कृती समितीचे म्हणणे आहे की:

त्यांनी अनेकदा DFCC, रेल्वे प्रशासन, व DRM यांच्याशी संपर्क साधला, पण यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेतला जात नसल्याने ही कारवाई आवश्यक ठरली.

प्रमुख मागण्या :

  • जोपर्यंत पर्यायी व्यवस्था तयार होत नाही, तोपर्यंत LC-42 फाटक सुरू करावे.
  • सिग्नल यंत्रणेद्वारे फाटक चालू ठेवावा.
  • DFCC च्या नियमानुसार कमीत कमी peak hours मध्ये फाटक खुले ठेवावे.

संघटना :

सफाळे विकास कृती समिती

(संपर्क – 8805582460 / 9867719964)



Leave a Comment