Palghar Nargrik

पालघर जिल्ह्यासाठी मोठी दिलासादायक बातमी – “MH-60” कोडसह नव्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला मंजुरी!

पालघर: आदिवासी बहुल आणि वेगाने विकसित होत असलेल्या पालघर जिल्ह्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले की पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आले असून, आता MH-60 हा जिल्ह्याचा स्वतंत्र वाहतूक क्रमांक असणार आहे.लोकदरबारातील आश्वासन झाले पूर्ण ९ एप्रिल रोजी पालघर येथे संपर्कमंत्री या नात्याने झालेल्या लोकदरबारात सरनाईक यांनी दिलेले आश्वासन अखेर प्रत्यक्षात उतरले. “पालघर जिल्ह्याच्या नागरिकांसाठी स्वतंत्र RTO कार्यालय सुरू करण्याचे वचन मी दिले होते, आणि त्याची पूर्तता आज होत आहे,” असे त्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले.

जनतेला होणार मोठा दिलासा यापुढे जिल्ह्यातील नागरिकांना वाहननोंदणी, परवाने, वाहन तपासणी यांसारख्या कामांसाठी वसई-विरारला जावे लागणार नाही. त्यामुळे वेळ, श्रम आणि आर्थिक खर्चाची मोठी बचत होणार आहे. स्थानिक पातळीवरच सेवा उपलब्ध झाल्यामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गती वाढण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांचे आणि उपमुख्यमंत्र्यांचे आभार पालघरसाठी स्वतंत्र परिवहन कार्यालय मंजूर करून तातडीने कार्यवाही करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे मंत्री सरनाईक यांनी खास उल्लेख करून आभार मानले.

Leave a Comment