पालघर: गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणामुळे निवडणुका रखडल्या होत्या. मात्र नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
या पार्श्वभूमीवर व ओबीसी समाजाला त्यांच्या हक्कांसाठी जागरूक करण्याच्या उद्देशाने ‘ओबीसी हक्क संघर्ष समिती, पालघर जिल्हा’च्या वतीने विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दिनांक २७ मे २०२५ रोजी शिक्षक पतपेढी वळणनाका पालघर येथे संध्याकाळी ०४.०० वाजता होणार आहे. समितीचे अध्यक्ष मा. राजीवनाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत न्यायालयाच्या निर्णयाची माहिती, पुढील कार्ययोजना, समाजातील जनजागृती, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी समाजासंदर्भातील भूमिकेवर चर्चा होणार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी ही बैठक ठरणार मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.