Palghar Nargrik

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे नागरिकांना आवाहन.

📍 पालघर

पालघर नागरिक ब्रेकिंग न्यूज..

जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे नागरिकांना आवाहन.
“दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यां, नाल्यांमधून किंवा पुलावरून पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नका!”भारतीय हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी 5 व 6 जुलै 2025 रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. इंदु राणी जाखड यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

महत्त्वाचे निर्देश.दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यां, नाले, ओहोळ किंवा पूल ओलांडू नका.

शॉर्टकट म्हणून पाण्यातून प्रवास करू नका; नेहमीच्या रस्त्याचा वापर करा.
रस्ता पाण्याखाली गेला असल्यास पोलिस किंवा प्रशासनाची परवानगी घ्या.
विद्यार्थ्यांनी परिस्थिती शिक्षकांना कळवा; टायर ट्यूब, झाड किंवा राफ्टचा वापर टाळा.
आपला जीव धोक्यात घालू नका; सुरक्षिततेचे सर्व नियम पाळा.

जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी आणि पालकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे.

सतर्क राहा, सुरक्षित राहा!

Leave a Comment