Palghar Nargrik

श्री विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनातून पर्यावरणाचा आणि पाणी बाचतीच संदेश

श्री विठ्ठल- रखुमाईच्या दर्शनातून पर्यावरणाचा आणि पाणी बाचतीच संदेश

वासुदेव गणू वर्तक संकुलग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळ संचालित लो.ज.ना.वि. आणि अ. ज. वर्तक कनिष्ट महाविद्यालय आणी लायन्स क्लब ऑफ बॉम्बे वेस्ट इंग्रजी माध्यम शाळा आगरवाडी ह्यांच्या सहभागाने शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त आगरवाडी गावात दिंडी काढली. यावेळी ग्रामस्थांना साक्षात श्री विठ्ठल- रखूमाईचे दर्शन घडवून पंढरीच्या वारीचा अनुभव घेता आला. श्री विठ्ठल राखूमाईच्या व श्री रामाच्या मंदिराबाहेर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. भजन, कीर्तन,टाळ यामुळे वारी बहरून आली.

ज्ञानोबा,माऊली, तुकारामाच्या गजरासोबत आगरवाडी ग्रामस्थांना पर्यावरण आणि पाणी बचतीचा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला. दोन्ही संस्थेचे सचिव विश्वनाथ पाटील व पी.टी.पाटील, सदस्य नंदन वर्तक, नितीन वर्तक, रविन्द्र ठाकूर आणि मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विदुला पाटील, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका रुपाली भोईर ह्यांच्यासह सर्व सहशिक्षकांनी  सहभाग घेतला.

Leave a Comment