Palghar Nargrik

श्री नित्यानंद महाराज यांच्या दर्शनाला चाललेल्या पायी पालखी दिंडीतील भक्तांची पायाला तेलाची मालिश करून चरण सेवा करण्यात आली.

📍पालघर

चरण सेवा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष पालघर व आदिवासी एकता मित्र मंडळ, नालासोपारा आयुर्वेद कॉलेज

यांच्या संयुक्त विद्यमाने आज सोमवार दिनांक 7 जुलै 2025 रोजी सातिवली येथे सातपाटी हून गणेशपुरी येथे

श्री नित्यानंद महाराज यांच्या दर्शनाला चाललेल्या पायी पालखी दिंडीतील भक्तांची पायाला तेलाची मालिश करून चरण सेवा करण्यात आली.

या प्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मदाय रूग्णालय मदत कक्ष पालघर चे कक्ष प्रमुख डॉक्टर श्री रुपेशजी बाबरेकर ,वैद्यकीय समाजसेवक श्री हरीशजी जाधव, समन्वयक श्री वैभव मेस्त्री, आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉक्टर व विद्यार्थी, माजी सरपंच, सातीवली ग्रामस्थ उपस्थित होते तसेच आदिवासी एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष जनाठे, श्री दामोदर कासट, श्री मंगेश गोंड, श्री हरिश्चंद्रबुवा दळवी, श्री सतीश सांबरे, श्री सांबरे सर, श्री महेश भुतकडे, श्री अमजत खान आदी कार्यकर्ते यांनी शिबिराची चोख व्यवस्था पार पाडली.

Leave a Comment