Palghar Nargrik

❗रोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश – ७ आरोपी अटकेत

📰 पालघर नागरिक कटाक्ष न्यूज
मनोर पोलीस यांची कामगिरी उल्लेखनीय!
दिनांक: 14 jun2025.

पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेली एक टोळी पकडण्यात आली असून, पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई ३ जून २०२५ रोजी रात्री २.१० वा. गोणपाडा गाव हद्दीत करण्यात आली.

मनोर पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, काही संशयित रात्रीच्या वेळी गावच्या हद्दीत संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, एका वाहनातून फिश प्लेट्स, कटिंग सेट, वायर आणि इतर साहित्य हस्तगत झाले. प्राथमिक चौकशीत ही टोळी दरोड्याच्या उद्देशाने जमली असल्याचे स्पष्ट झाले.

अटक करण्यात आलेले आरोपी.
1. संदीप अशोक तळवी (वय २६, तळविपाडा, पालघर)
2. शुभम गणेश राठे (वय २६, तळविपाडा, पालघर)
3. श्रवण भगवान गुज्जर (वय २४, कुंड, विक्रमगड)
4. रमाकांत रमेश सालकर (वय २५, देहणे, विक्रमगड)
5. प्रणय रामग्राम गावित (वय १९, कुंड, विक्रमगड)
6. अनोम अशोक वांगड (वय २०, वाघोबा, पालघर)
7. भरत अरविंद मेंढा (वय २३, भोपोली, विक्रमगड)

या आरोपींविरुद्ध IPC कलम 399, 402, 120(B), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रथमवर्ग न्यायालयाने ६ जून २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक विवेकानंद राठोड, पोलीस निरीक्षक सागर गावित, स.पो.नि. गणेश अहिरे तसेच पोलीस हवालदार नेमाडे यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.उपनिरीक्षक/सहाय्यक नेमाडे, मनोर पोलीस ठाणे करत आहेत.

Leave a Comment