प्रतिक मयेकर
बोईसर: “ग्राहक देव असतो” हे वाक्य फक्त बोर्डावर, पण प्रत्यक्षात… सूपात झुरळ! बोईसर पूर्वेतील यशवंत सृष्टी परिसरातील प्रसिद्ध हॉटेल “चायनीज हब” मध्ये सूपमध्ये झुरळ आढळल्याची तितकीच घृणास्पद आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर ग्राहक संतप्त झाले असून, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सूप का ‘झुरळ सुप’?
एकीकडे स्वच्छ भारत अभियानाचे ढोल बडवले जातात, तर दुसरीकडे शहरातल्या हॉटेलमध्ये लोकांच्या ताटात झुरळ परोसलं जातंय! हा केवळ गलिच्छपणाचं प्रकरण नाही, तर ग्राहकाच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा गुन्हा आहे. ग्राहकाने सूप ऑर्डर केलं, पहिल्याच चमच्यांत झुरळ दिसताच त्याने हॉटेल व्यवस्थापनाला याबाबत जाब विचारला. मात्र हॉटेलवाल्यांच्या चेहऱ्यावर कोणताही शोक, लाज किंवा माफी दिसली नाही. उलट दुर्लक्षच! संतप्त ग्राहक – सोशल मीडियावर स्फोट या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला. “आज झुरळ, उद्या घाणेरडं तेल, परवा अन्नातून विष – आम्ही मरणार कधी?” असा प्रश्न नेटिझन्स विचारत आहेत.
प्रशासन झोपलंय की मुद्दाम दुर्लक्ष करतंय?
हॉटेलमध्ये अशी गलिच्छ अवस्था असूनही प्रशासन गप्प आहे. अन्न व औषध प्रशासन, आणि आरोग्य अधिकारी यांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे समजते. या हॉटेलने आरोग्य परवाना खरोखर घेतला आहे का? दररोज साफसफाईची नोंद होते का? खाद्यपदार्थ तपासले जातात का?