Palghar Nargrik

Breaking news

एसटी च्या पालघर स्वारगेट शिवशाही बस मध्ये झुरळांचा हैदोस

पालघर | मयूर ठाकूर पालघर डेपोच्या शिवशाही बस मध्ये प्रवश्याना झुरुळ असल्याची तक्रार करण्यात आली असून, सफाई कर्मचारी किंवा मैक्यानिकाल स्टाफ यांचे या कडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. सफाई कर्मचारी किंवा मैकेनिकाल स्टाफ यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असलेले क्लार्क किंवा सुपरवायझर ह्यांचे जेवढा पगार घेतो तेवढे काम सुद्धा करत नसल्याचे समोर आले आहे.आपल्या कामानिमित्त … Read more

जेष्ठ नागरिकांचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

पालघर  पालघर जिल्ह्याला हादरवून ठेवणाऱ्या कुडण येथिल दोन जेष्ठ नागरिकांच्या खुन्याला नागरिकांना सोबत मिळून अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले असून,आरोपी किशोर कुमार मंडळ याला आज रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यावर पालघर न्यायालयात हजर केले असता,अधिक तपासासाठी पोलिस कोथडीत पाठवण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपी किशोरकुमार मंडळ याला सात मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.या संदर्भात माहिती देण्यासाठी … Read more

पीर कमलीशाह बाबाचा उर्स २ मार्च रोजी

पीर कमलीशाह बाबाचा उर्स २ मार्च रोजी  पालघर तालुक्यातील शिरगाव येथील हजरत सैय्यद कमलीशाह बाबा (रहे.) यांच्या ऐतिहासिक उर्स सोहळा शनिवारी २ मार्च रोजी होणार आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उर्स सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळणार आहे. या दिवशी सालाबादप्रमाणे बाबांच्या संदलनिमित्त वाजत-गाजत भव्य मिरवणूक सातपाटी येथून काढली जाणार आहे. उर्स निमित्त पालघर … Read more

स. तु. कदम शाळेच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकाची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप. विशेष प्रतिनिधी,पालघर. पालघर मधील जीवन विकास शिक्षण संस्था संचलित स. तु. कदम शाळेचे संचालक वागेश सदानंद कदम व प्रणव वागेश कदम यांच्या विरोधात पालघर पोलीस स्टेशन येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी गुन्हा रजि. नंबर ३२/२०२४ अन्वये भादविस कलम ४०६, ४२०, ४६८, ४७१ व ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल … Read more

मनोर येथिल बुल शार्क मादीच्या गर्भाशयात मिळाली १५ पिल्ले

पालघर | प्रतिनिधी मनोर येथिल वैतरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचे बुल शार्क माशाने लचके तोडले होते. मनोर जवळील वैतरणा नदी पात्रात महाकाय मासा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. विकी सुरेश गोवारी (वय 32) असे शार्क माशाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.ही घटना मंगळवारी (दि.13) दुपारच्या सुमारास घडली होती. त्या नंतर तो मासा … Read more

आमदार अपात्रता निकालानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का,आता मशाल चिन्हही जाणार…?

आमदार अपात्रता निकालात उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला. मात्र उद्धव ठाकरेंच्या अडचणी काही थांबताना दिसत नाही. आता ठाकरेंचं मशाल हे चिन्हही (Mashal Symbol) त्यांच्या हातून जाण्याची भीती आहे. मशाल चिन्हावर समता पक्षाने (Samata Party) पुन्हा दावा ठोकलाय. निवडणूक आयोगाने नोंदणीकृत मात्र मान्यता नसलेल्या पक्षांना चिन्ह देण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे.. त्यानुसार समता पक्षही … Read more

कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत कधी येणार? महापालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती..

घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी आता कोस्टल रोड (Coastal Road) लवकरच सुरू होणार आहे. कोस्टल रोड टोल मुक्त असणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर आता या मार्गाबद्दल मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल चहल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘एबीपी माझा’सोबत संवाद साधताना त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.मुंबई … Read more

ठरलं! शिवसेना एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरेंची? ‘या’ तारखेला फैसला…

शिवसेना कोणाची याचा फैसला पुढच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. सुप्रीम कोर्टात शिवसेना (Shivsena) कोणाची यावर 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. 15 डिसेंबरला हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं होतं. मात्र, तेव्हा 2 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली. शिवसेनेतून शिंदे गट फुटल्यानंतर ठाकरे तसंच शिंदे गटाकडून पक्ष तसंच चिन्हावर दावा करण्यात आला होता. निवडणूक … Read more

राज ठाकरे सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; ‘या’ मुद्यांवर चर्चा…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या वर्षात सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shind) यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचं मुंबईतील वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकरही (Bala Nandgaonkar) उपस्थित होते. राज ठाकरे यांनी या भेटीदरम्यान मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुर्नविकास, राम मंदिर, मुंबईतील विविध … Read more

टोल एक झोल ची आणखीन एक कार बळी

पालघर | प्रतिनिधी   पालघर जिल्ह्यातील चारोटी टोल नाक्यावर दोन ट्रक मध्ये कार चे सॅन्डविच झाल्याची घटना आता ताजी घडलेली असून कार मध्ये परिवार सुरक्षित आहे.शनिवार रविवार आणि किसम्स च्या लागोपाठ आलेल्या सुट्या चे औचित्य साधून बाहेर फिरायला निघालेला परिवाराचे मुंबई गुजरात लेनवर एका ट्रक च्या पाठी टोल भरायला लाईनीत उभ्या असलेल्या कारला पाठीमागे येणाऱ्या … Read more