Palghar Nargrik

Breaking news

संघर्ष संघटने तर्फे शिक्षकांचा सत्कार

पालघर | प्रतिनिधी संघर्ष संघटने तर्फे गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधा कृष्णन यांचा जन्म दिवस अर्थात शिक्षक दिनाचे औचित्य साधून आपल्या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.सफाळे येथिल देवभूमी सभागृहात हा शिक्षकांचा सत्काराचा कार्यक्रम पार पडला. या वेळी जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक, आणि अंगणवाडी सेविका यांचा देखिल या वेळी … Read more

भ्रष्टाचारात लुटला पालघर जिल्हा…? सहा विधानसभा मतदार संघांचा लेखा जोखा..

बोईसर विधानसभा (मयूर ठाकूर) बोईसर विधानसभा हा मतदारसंघ बोईसर पास्थळ पासून मनोर मार्गे वसई पुर्व पासून ते तिल्हेर-शिरवली पर्यंत पसरलेला आहे. या विधानसभा मतदार संघ निर्माण झाल्या पासून बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व पंधरा वर्षा पासून कायम आहे.आधी दोनवेळा बहुजन विकास आघाडीचे विलास तरे हे आमदार होते. गेल्या वेळी विलास तरे यांनी बहुजन विकास आघाडीतून बंडखोरी … Read more

डहाणू गावातील रिक्षाचालकास राजकीय व्यक्ती कडून बेदम मारहाण

पालघर | जावेद लुलानिया डहाणू शहरातील अय्याज संजनिया या रिक्षा चालकास दोन वर्षा पूर्वी मोडलेले लग्न, डोक्यात ठेऊन मिर्ची पूड डोळ्यात टाकून, कोयत्याने वार करून मारहाण करण्यात आलेली असून, तक्रार दाखल होताच आरोपी फरार झाला असल्याचे बोलले जात आहे.शाबाज पिरजादा असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव असल्याचे बोलले जात असून.आरोपीला राजकीय वरद हस्त असल्याने पोलिस आरोपीला … Read more

आनंद वृद्धाश्रम शिरगाव येथे दहीहंडी उत्सव साजरा केला.

शिरगाव येथील आनंद वृद्धाश्रम येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील साई गणेश गोविंदा पथक यांच्या माध्यमातून श्री.तन्मय गणेश संखे यांच्या संकल्पनेतून आश्रमातील कुटुंबीयांसोबत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला साई गणेश गोविंद पथक हे प्रत्येक वर्षी आश्रमातून सुरुवात करून नंतर पालघर, बोईसर ,वाणगाव डहाणू असा प्रवास करत परिसरातील दहीहंडी फोडण्यासाठी मार्गस्थ होतात. याप्रसंगी मोठ्या संख्येने साई गणेश गोविंदा … Read more

पालघर- पर्यावरण सुरक्षा आणि वाढणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विरोधात सायकल रॅली.

रोटरी क्लब ऑफ पालघर आणि इनरव्हील क्लब ऑफ पालघर व यश फॉउंडेशन यांचा सयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित केलेल्या मॉन्सून सायकल रॅलीमध्ये पालघर मधील अकरा शाळांमधून २७० पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यश फाउंडेशन आणि R5 फौंडेशन चे श्री कृपाल रावत यांच्या तर्फे विजेत्यांना सायकली आणि ट्रॉफीज देण्यात आल्या. सर्व स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक चाणक्य … Read more

विक्रमगड मध्ये अवैध धंदे जोरात….?

पालघर जिल्ह्यात सध्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार आलेले असून, आपल्या पत्नीला आलेले ते पैसे जोर जबरदस्ती ने त्यांच्या कडून हिसकावून घेऊन, त्या पैशाने, जुगार,मटका, तिथली पोपट,खेळून त्या पैशाची दारू पिऊन आपल्या बायकोला मारणे हे कामं सद्या नवरे करत आहेत, आधीही आपली मेहनतीची कमाई जुगारात उडवून बायका मुलांना उपाशी मारणे हे कामं सुरु … Read more

मन सुन्न झालंय…आठवडाभरातच 12 घटना, शालेय मुलींवरील अत्याचाराने हादरला ‘पुरोगामी महाराष्ट्र’

बदलापूरमध्ये (Badlapur School Abuse)  एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचं तीव्र पडसाद मुंबईसह राज्यभर उमटताहेत. अत्याचाराच्या घटना वाढत असून घृणास्पद कृत्य करणाऱ्यांच्या मनात कायद्याची भीती राहिली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये बलात्कार, लैंगिक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र … Read more

हेराल्ड ग्लोबल या जागतिक संस्थेद्वारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत प्रतिष्ठित “प्राइड ऑफ इंडिया – आयकॉन 2024” पुरस्काराने सन्मानित… 

  हेराल्ड ग्लोबल आणि ईआरटीसी मीडिया द्वारे “Pride of India – Icon 2024″ प्राइड ऑफ इंडिया – आयकॉन 2024” हा पुरस्कार भारताच्या अभिमानाला मूर्त रूप देणाऱ्या प्रतिष्ठित नेत्यांचा सन्मान करण्यासाठी देण्यात येतो. देशास अभिमानास्पद कामगिरी, कर्तव्याप्रति वचनबद्धता, दूरदर्शी नेतृत्व, महत्त्वपूर्ण योगदान, भारताच्या समृद्ध वारसाचे प्रतिबिंब आणि अर्थव्यवस्थेवरील परिवर्तनात्मक प्रभाव अशा विविध बाबींची दखल घेऊन शिवसेना … Read more

बदलापूरचा ‘नराधम’ अक्षय शिंदे मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोर्टात, कल्याण न्यायालयाचा मोठा निर्णय

बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली असून त्याचा मुक्काम आता आणखी पाच दिवसांनी वाढला आहे. आरोपी अक्षय शिंदे याला सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास मोठ्या पोलीस बंदोबस्तात कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची पोलीस कोठडी … Read more

रक्षाबंधन चा भाजप च्या पालक मंत्र्यांना घरची भेट ……?

    पालघर | प्रतिनिधी भाजप पालघर चे पालक मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या रविंद्र चव्हानांना युतीतील शिवसेना नेते रामदास कदमांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत घरीच ओवाळणी घातलेली असून, पालघर च्या जनतेला आलेला अनुभव रामदास कदमाणी त्यांच्या तोंडून सांगितला असल्याचे समोर आले आहे. पालघर भाजपानी त्याचा निषेध विडिओ प्रसिद्ध केला असल्याचे समोर आले आहे. राज्याचे … Read more